भारत आणि संयुक्त राष्ट्रे यांतील संबंध बघुया..
पहिल्या महायुद्धाच्या भीषण संहारानंतर व्हर्साय च्या तहवर भारताने स्वाक्षरी केली. इ स १९२० मध्ये आंतरराष्ट्रीय शांततेच्या प्रश्नाला चालना देण्यासाठी राष्ट्रसंघ( league of nations) ही संघटना स्थापन करण्यात आली, राष्ट्रराष्ट्रांमधील संबंध सुधारने, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सामंजस्याचे वातावरण प्रस्थापित करने ही या संघटना स्थापन करण्यामागची काही उद्दिष्टे होती.भारत हा राष्ट्रसंघाचा सुरुवतीपासूनच सदस्य राहिला होता. राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाल्याने आंतरराष्ट्रीय समुदयातील एक प्रमुख घटक म्हणुन भारताला मान्यता मिळाली. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय या आंतरराष्ट्रीय संघटनांचे सदस्यत्वही भारताने स्वीकारले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा सदस्य या नात्याने भारताने महत्वपूर्ण योगदान केले होते. भारताच्या प्रतिनिधींनी भारतीय कामगार वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या संघटनेच्या व्यासपीठाचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला.
पुढे दुसऱ्या महयुद्धानंतर 'संयुक्त राष्ट्रे' ही नवी आंतरराष्ट्रीय संघटना इ.स.१९४५ मध्ये स्थापन करण्यात आली. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे भरलेल्या परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्यात आला.भारत या परिषदेत सहभागी झाला होता; तसेच संयुक्त राष्ट्रांचा संस्थापक सदस्य या नात्याने भारताने संयुक्त राष्ट्राच्या सनदेवर स्वाक्षरीही केली होती,यावरून स्वतंत्र्यपूर्व काळापासूनच भारताचा निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांशी कसा संबंध आला होता हे स्पष्ट होते. भारताने आंतरराष्ट्रीय संघटनांचा नेहमी आदर केला आहे. या संघटनांच्या प्रतिष्ठेचे रक्षण जले पाहिजे अशी भारताची भूमिका राहिली आहे. भारताच्या या भूमिकेला स्वातंत्र्यपूर्व काळापासून आंतरराष्ट्रीय संघटनांशी प्रस्थापित झालेल्या त्याच्या संबंधांची पार्श्वभूमी लाभली आहे.
भारताने नेहमी संयुक्त राष्ट्रसंघात शांतिसेनेची महत्वपूर्ण भूमिका पार पडली आहे. आपले सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रसंघाच्या आमसभेत हिंदी म्हणजे आपल्या राष्ट्र्भाषेत भाषण केले. राष्ट्र्भाषेत भाषण करणारे ते दूसरे पंतप्रधान आहेत. पाहिले पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरुण केले. या आवाहनचे सर्वच स्तरावरून स्वागत करण्यात आले. २१ जून रोजी जगभरात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. २१ जून २०१५ रोजी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून तसेच आम सभेचे अध्यक्ष सॅम पित्रोदा हे अमेरिकेतील मेडिसन स्क़्वेअर येथे उपस्थित राहून हा कार्यक्रम साजरा केला यावेळी आर्ट ऑफ़ लिव्हींग चे सर्वे सर्वा श्री श्री रविशंकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संयुक्त राष्ट्रसंघाचे स्थायी सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताचे जोरजोरदार प्रयत्न चालू आहे. यासाठी अमेरिका आणि रशिया यांनी पाठिंबा देण्याचे जाहिर केले आहे. आपल्या देशाने शांतिसेने मध्ये केलेले कार्य तसेच जगात शांतता नांदावी म्हणून केलेले प्रयत्न बघता लवकरच आपला देश संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर आपले स्थान निर्माण करू शकतो.
वैभव सुरेश कातकाडे
एम जे एम सी
के टी एच एम कॉलेज
No comments:
Post a Comment