Saturday, January 23, 2016

भारत आणि म्यानमार संबंध...

भारत आणि म्यानमार संबंध बघूया….  

पूर्वी ब्रम्ह्देश या नावाने ओळखला जात असलेला आणि सद्यस्थितीत त्याचे म्यानमार असे नामकरण झाले आहे. हा देश आपल्या पूर्वेला आहे. त्याचे क्षेत्रफळ सहा लक्ष शहात्तर हजार चौ.कि.मी. असून त्याची लोकसंख्या चार कोटी अठ्ठ्यात्तर लाख आहे. आग्नेय आशियातील इतर कोणत्याही देशाची सीमा भारताला लागून नाही फक्त म्यानमार आणि भारत यांच्या सीमा परस्परांना लागून आहे; त्यामुळेच म्यानमार व भारत यांच्यात पूर्वीपासून संबंध चालत आले आहे.

ब्रिटिशांनी ब्रम्ह्देशावर नियंत्रण प्रस्थापित केल्यावर तो देश ब्रिटीश साम्राज्याचा एक भाग असलेल्या भारताला जोडण्यात आला. अशा प्रकारे ब्रम्हदेश भारताचा भाग बनला. आणि त्या देशाचे प्रशासन भारताकडून चालवले जावू लागले. कालांतराने इ.स.१९३५ च्या कायद्यान्वये ब्रम्ह्देश भारतापासून वगळा करण्यात आला आणि १९३७ पासून त्याचे प्रशासन स्वतंत्रपणे चालवले जाऊ लागले. या काळात परस्पर देशांचे नागरिक व्यापार आणि व्यवसायाच्या निमित्ताने परस्पर देशात स्थायिक झाले.परिणामी दोन्ही देशात सांस्कृतिक संबंध प्रस्थापित जाहले.

भारतातील बौद्ध धर्माचा प्रसार आग्नेय आशियातील अनेक देशात आला. म्यानमारमध्ये देखील प्राचीन काळात बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. आज देखील या देशात बौद्ध धर्माचे लोक जास्त प्रमाणात आढळतात. या धर्मामुळे दोन्ही देशात सांस्कृतिक नाते जोडले गेले आहे.

४ जानेवारी १९४८ रोजी म्यानमार राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर भारत आणि म्यानमार मध्ये खऱ्या अर्थाने राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली, या दोन्ही देशांमध्ये भरपूर प्रमाणात साम्य आहे. हे देश निकटचे शेजारी असल्याने त्यांत पूर्वीपासून राजकीय, सांस्कृतिक, आणि व्यापारी संबंध चालत आहेत. दोन्ही देशांना साधारणपणे एकाच काळात स्वतंत्र मिळाले असल्याने सुरुवातीच्या काही कालखंडात दोन्ही देशांचे परराष्ट्र संबंध जवळपास सारखेच आहेत,

या दोन्ही देशांनी साम्राज्यवाद आणि वसाहतवादाला विरोध केला. जगातून साम्राज्यवाद आणि वसाहतवाद यांचे उच्चाटन झाले पाहिजे असा आग्रह या देशांनी धरला होता. आतंरराष्ट्रीय समुदायातील अनेक राष्ट्रांनी या धोरणाला पाठींबा दर्शवला होता. परिणामी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगातून साम्राज्यवाद व वसाहतवाद यांचे उच्चाटन झाले. 

पंचशील तत्वांचा पुरस्कार तसेच अलीप्ततावादाचा पुरस्कार हि प्रमुख साम्ये म्हणता येतील. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन जागतिक महासत्तांपैकी कोणत्याही एका बाजूला न झुकण्याचे धोरण या राष्ट्रांनी ठेवले होते. १९५५ च्या बाडुंग परिषदेत म्यानमार ने पंचशील तत्वांना पूर्ण पाठींबा दिला होता.

भारत आणि म्यानमार यांच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांमध्ये ऑक्टोबर २००५ मध्ये झालेल्या बैठकीत अमली पदार्थ, तस्करी, चोरता व्यापार यांवर बंधने घालण्याचे एकमत तयार झाले.


वैभव सुरेश कातकाडे
एम जे एम सी
के टी एच एम कॉलेज

No comments:

Post a Comment