Thursday, March 3, 2016

आशियान..




आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना 




आशियान हि आग्नेय आशियाई राष्ट्रांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संघटना होय. आशियान हि जगातील एक महत्वाची क्षेत्रीय संघटना आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्रा-राष्ट्रांचे संबंध जसे संघर्षाचे असतात तसे ते सहकार्याचे देखील असतात. आंतरराष्ट्रीय समुदायातील निरनिराळी राष्ट्रे सहकार्याच्या दृष्टीने एकत्र येऊ शकतात.
आशियान या क्षेत्रीय संघटनेची स्थापना १९६७ मध्ये बँकाँक जाहीरनाम्याद्वारे झाली. या संघटनेमध्ये पुढील १० देशांचा सहभाग आहे.
ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपाईन्स,  सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम इ.
भारत आणि आशियान च्या प्रत्य्रेक देशाचे संबंध खूप प्रमाणात सारखे आहेत. यांचा फायदा भारताला आग्नेय आशिया सोबत व्यापारी सामाजिक तसेच राजकीय संबंध ठेवण्यास भरपूर झालाआहे. महत्वेकरून १९९१नंतर आपल्या देशाने या क्षेत्रीय संघटनेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यामुळेआग्नेय आशियाई देशांसोबतचे आर्थिक राजकीय संबंध दृढ होण्यास मदत होते आहे. आपल्या देशाने आशियनचे महत्व ओळखून या संघटनेमध्ये सदस्यत्वासाठी प्रयत्न सुरु केले आहेत



आग्नेय आशियाई राष्ट्रांच्य संघटनेनेदेखील आता आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याबाबत विचार सुरु केलाआहे. त्या दृष्टीने तिने आशीय खंडातील इतर राष्ट्रांशी आर्थिक आणि इतर क्षेत्रांत सहकार्य करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहे. आशिया खंडातील काही राष्ट्रांना क्षेत्रीय व संवाद भागीदार म्हणून आपल्यात सहभागी करून घेतले आहे. यामध्ये भारताचे स्थान मजबूत असेच आहे; त्यामुळे आता या संघटनेशी भारताचे संबंध प्रस्थापित झाले आहे. भारतव आशियान यांमध्ये शिखर संमेलने भरून आणली जात आहेत हे दोन्हींच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पाउल होय.


आशियान आणि भारत यांमध्ये मुक्त व्यापारी क्षेत्र स्थापन व्हावे असे भारताला नेहमी वाटते. आशियान देशांनीही याबाबत पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.तसे झाल्यास भारताचे आशियान देशांसोबत घनिष्ठ व्यापारी संबंध निर्माण होतील.


वैभव सुरेश कातकाडे  
एम जे एम सी
के टी एच एम कॉलेज

Wednesday, March 2, 2016

भारत श्रीलंका

भारत आणि श्रीलंका यांतील संबंधांचा अभ्यास बघु....
भारताच्या दक्षिण दिशेला असलेला आशिया खंडातील एक छोटासा देश होय. हा देश म्हणजे भारताला जवळ असलेले हिंदी महासागरमधील एक बेट होय. या देशाचे क्षेत्रफल ६५,६१० चौ.कि.मी. इतके असून लोकसंख्या सुमारे २ कोटि आहे. श्रीलंका पूर्वी सीलोन या नावाने ओळखला जात होता. इ.स. १९७२ मध्ये त्याच्या नावात सीलोन ऐवजी 'श्रीलंका' असा बदल  करण्यात आला. या देशात प्रामुख्याने सिंहली आणि तामीळ वंशाच्या लोकांचे वास्तव्य आहे. सिंहली आणि तमिळ या दोन भाषा बोलल्या जातात.
भारत आणि श्रीलंका यांमध्ये भौगोलिक निकटता असल्याने अगदी प्राचीन काळापासून हे दोन्ही देश परस्परांच्या संपर्कात आले असल्याने पह्वयास मिळते.या दोन्ही देशांमध्ये भरपूर साम्यस्थळे आहेत. या साम्यस्थळांचा प्रत्यय राजकीय क्षेत्रातही दिसतो. दोन्ही देश ब्रिटिशांच्या सम्राज्याखाली होते साधारण एकाच काळात हे दोन्ही देश परतंत्र्यातून मुक्त झाले. भारत १९४७ तर श्रीलंका १९४८ मध्ये स्वतंत्र झाला.
स्वतंत्र्यानंतर दोन्ही देशांनी अलिप्ततावादाचा पुरस्कार केला. दोन्ही राष्ट्रांनि शीतयुद्धाच्या काळात रशिया  लांब राहण्याचे धोरण ठेवले. त्याचप्रमाणे दोन्ही देश लष्करी गटांपासून दूर राहिले. साम्राज्यवाद आणि वसाहतवाद यांना विरोध करण्याचा मुद्दा हा या दोन्ही  देशांच्या साम्यस्थळांमधील महत्वाचा मुद्दा होय. भारत आणि चीन यांनी केलेल्या पंचशील तत्वांना नंतर श्रीलंका आणि भारत यांनी हा मुद्दा पुढे चालू ठेवला.
प्रस्तुत देशांमधील वादाचा मुद्दा श्रीलंकेमधील तमिल लोकांच्या भवितव्याचा होय. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि  श्रीलंका पंतप्रधान जॉन कोटलेवाला यांमध्ये १९५४ मध्ये एक करार झाला. त्या कराराला भारत  करार  म्हणतात.
भारत व श्रीलंका यांतील द्विपक्षीय संबंधत १९५६ नंतर सुधारना होत गेली. त्यात श्रीलंकेमध्ये झालेले सत्तापरिवर्तन कारणीभूत ठरले होते. १९५६ मध्ये श्रीलंकेमध्ये श्रीलंका फ्रीडम पार्टी हा पक्ष अधिकरवार आला. त्यामुळे पक्षाचे नेते भंडारनायके हे पंतप्रधान बनले. त्यांचे आणि पंतप्रधान नेहरू  अधिक घनिष्ठ  होते. साहजिकच दोन्ही देशांमधील संबंधांना विकासाचे रूप प्राप्त झाले.
नंतरच्या काळात चीनी आक्रमणाच्या प्रश्न  आणि त्यावर श्रीलंकेने तटस्थतेची भूमिका स्वीकारली तरी इतर  काही मुद्द्यांवर त्यांनी भारताची बाजु उचलून धरली होती. भारत सरकारने पोर्तुगाजांचगया ताब्यातून जेव्हा गोवा दीव दमन यांविरुद्ध लष्करी करवाई केली तेव्हा श्रीलंकेने भारताच्या कृतीला उघड पाठिंबा दिल होता.
वैभव सुरेश कातकाडे 

एम जे एम सी
के टी एच एम कॉलेज