भारत आणि अमेरिका यांतील संबंध बघूया...
जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेली अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही
असलेला भारत या दोन्ही देशांमधील संबंध शीतयुद्ध काळामध्ये अनेक प्रश्नांवरून
तणावपूर्ण होते. दोन्ही देशांचा जागतिक राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन भिन्न
होता. भारत हा आदर्शवादी दृष्टीकोनातून जागतीक राजकारणाकडे बघतहोता तर अमेरिका हा
हितसंबंधांच्या आणि वास्तववादी
दृष्टीकोनातून जगाच्या राजकारणाकडे बघत होता. दृष्टीकोन वेगवेगळा असला तरी
दोघांमध्ये शत्रुत्व नव्हते म्हणजे संबंध ताणले गेलेले होते,पण तुटलेले नव्हते. भारताच्या
अलिप्ततावादी धोरणाबाबत अमेरिकेला अनेक आक्षेप होते. दुसरीकडे भारताचा कल हा
अमेरिकेपेक्षा रशियाकडे अधिक होता.त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधाच्या विकासाला
फारसा वाव मिळालेला नव्हता. १९७१ मध्ये भारतीय उपखंडात राजकीय परिस्थिती
धोक्याच्या वळणावर येऊन पोहचली होती एका बाजूला पाकिस्तानने आक्रमण केले होते आणिअंतर्गत
राजकारणात पंतप्रधानांना राजकीय संकटांना तोंड द्यावे लागत होते. पाकिस्तानला
अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर लष्करी व आर्थिक सहाय्य केले; अश्या परिस्थितीत भारताने
आत्मरक्षणाचा उपाय म्हणून भारताला सोव्हिएत युनियन सोबत सहकार्याचा करार करावा
लागला. भारत-पाकिस्तान युद्धावेळी अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेनेही भारतावर दडपण
आणण्याचे प्रयत्न केले; परंतु इंदिरा गांधी यांनी अमेरिकेच्या या प्रयत्नांना जराही
भिक न घालता आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणत्याही परकीय सत्तेच्या दडपणाखाली न येता
आपले स्वतंत्र धोरण आखण्याचे साहस इंदिरा गांधी यांनी दाखवले.
पुढेशीतयुद्धाचा शेवट झाला आणि
दोन्ही देशांमधील संबंधांच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. १९९१ नंतर पी.व्ही.नरसिंह
राव यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास सुरुवात झाली
याचे प्रमुख कारण भारतीय परराष्ट्र धोरणामध्ये घडून आलेले बदल...
यातील पहिला बदल म्हणजे,
भारताच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाचा परिणाम परराष्ट्र धोरणावर झालेला होता.
भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये आर्थिक आणि व्यापारी संबंधांना महत्व प्राप्त झाले
होते. त्याचबरोबर पाकिस्तान सोबत अमेरिकेची जवळीक हे सुद्धा प्रमुख कारण होते. दुसरा बदल म्हणजे संपूर्ण दक्षिण आशिया मधील काही
नवीन प्रवाह विकसित झाले होते. यामध्ये अण्वस्त्रीकरणाचा प्रवाह हा महत्वाचा होता.
१९९८मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश हि अण्वस्त्रधारी बनले. त्याच बरोबर
त्या काळात दहशतवादासारखा प्रश्न हि गंभीर बनू लागला होता. चीन चा आक्रमकतावादहि
या काळात वाढला होता या सर्वांमधून भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये
सहकार्यासाठी एक वाव निर्माण झाला होता.
काही मुद्दे असे आहेत ज्या बाबत
या दोन्ही देशांमध्ये हितसंबंधांमध्ये परस्पर व्यापकता आहे. या हितसंबंधाच्या
परस्पर व्यापकते मधूनच दोन्ही देशांचे संबंध घनिष्ट होण्यास सुरुवात झाली.यामध्ये
सर्वात महत्वाचे योगदान तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिले.

नंतरचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी देखील अमेरिकेसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला..भारत अमेरिका अणुसहकार्य करार हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला.
सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी २०१४ मध्ये अमेरिकेला भेट देऊन तेथील भारतीयांना भारतामध्ये गुंतवणूक
करण्याचे आवाहन केले. या दौऱ्यात त्यांनी‘जन-मुत्सद्देगिरी’चे एक उदाहरणच जगासमोर
ठेवले. यांनतर राष्ट्रप्रमुखांना आपल्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून
बोलावून हे संबंध अधिकच वृद्धींगत केले.
वैभव सुरेश कातकाडे
एम जे एम सी






