Wednesday, January 13, 2016

भारताचे परराष्ट्र संबंध...

ब्लॉग लिहिण्यासाठी प्रस्तुत विषय घेऊन पहिल्या ब्लॉग मध्ये परराष्ट्र संबंध म्हणजे काय? तसेच भारतीय परराष्ट्र संबंधाचे स्वरूप याचा आढावा घेऊ.
 सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय समुदायातील प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्रांशी वेगवेगळ्या प्रकारचे संबंध करणे स्वाभाविक बनले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे जगातील कोणतेही राष्ट्र स्वयंपूर्ण नाही आणि पृथ्वीच्या भौगोलिक परिस्थितीमुळे स्वयंपूर्ण होऊही शकत नाही.प्रत्येक राष्ट्राच्या गरजा अनेकविध स्वरूपाच्या असतात आणि त्याच्याकडील उपलब्ध संसाधनांच्या जोरावर त्यास आपल्या सर्व गरजांची पूर्तता करणे शक्य नसते. अशा परिस्थितीत प्रत्येक राष्ट्राला आंतरराष्ट्रीय समुदायातील अन्य काही राष्ट्राचे सहकार्य घेणे भाग पडते.
एखाद्या राष्ट्राने इतर राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करताना त्याविषयीची काही मुलभूत तत्वे सांभाळायला हवी तसेच हे संबंध प्रस्थापित करण्यासाठी निश्चित केलेल्या तत्वांना आणि धोरणांना त्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण असे म्हणतात. प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांना सर्वोच्च प्राधान्य देतो. आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण आणि वृद्धी करणे हे त्याचे अंतिम ध्येय असते. ह्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी राष्ट्र कितीही किंमत मोजायला तयार असते.राष्ट्रीय हितसंबंध जपण्यासाठी अथवा साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायातील राष्ट्रे आंतरराष्ट्रीय राजकारणात उतरतात आणि परस्परांशी निरनिराळ्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करतात.
    
राज्याचे परराष्ट्र धोरण ठरविण्यासंबंधीचे निर्णय घेण्याचे घटनात्मक अधिकार सरकारला मिळालेले असतात तरी परराष्ट्र धोरणाच्या निर्धारणात बाकी अनेक घटकांचा समावेश असतो. भौगोलिक परिस्थिती, ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी,लोकसंख्या,नैसर्गिक साधनसंपत्ती,लष्करी सामर्थ्य,औद्योगिक प्रगती,विचारप्रणाली,प्रसारमाध्यमे हे त्यापैकी क्काही महत्वाचे घटक होत. आधुनिक काळात लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेमुळे परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातही लीक्मातला महत्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय धोरण आणि परराष्ट्र धोरण यात सुसंगती असते. या दोन्हीही बाबी एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात; त्यामुळे यांत विसंवाद असून चालत नाही.
आपला भारत देश हा देखील आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक घटक आहे. आपल्या देशालाही आंतरराष्ट्रीय समुदायातील इतर राष्ट्रांशी वेगवेगळ्या प्रकारचे संबंध प्रस्थापित करावे लागतात. जगातील इतर देशांप्रमाणे आपल्या देशाचेही निश्चित असे असे परराष्ट्र धोरण आहे आणि राष्ट्रीय सरकार त्या धोरणाचा सातत्याने पाठपुरावा करीत आले आहे.
आपल्या देशाचे भौगोलिक स्थान लक्षात घेता त्यास आशिया खंडाचे मध्यवर्ती स्वरूप प्राप्त झाले आहे. पश्चिम आशिया आणि पूर्व तसेच आग्नेय आशिया यांना जोडणारा दुवा असे भारताचे वर्णन होऊ शकेल.प्राचीन काळात सुद्धा भारत व्यापाराचे एक महत्वाचे केंद्र म्हणून ओळखला जात होता.याशिवाय सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र म्हणून म्हणूनही भारताकडे बघितले जात होते.हिंदी महासागरातील एक प्रनुख देश म्हणून भारताचे आंतरराष्ट्रीय राजकारणात एक अढळ स्थान आहे.

वैभव सुरेश कातकाडे.. 
(एम. जे. एम. सी. )
प्रथम वर्ष


No comments:

Post a Comment