भारत चीन यांतील संबंधांवर प्रकाश टाकू...
स्वातंत्र्यानंतरआपल्याशेजारील राष्ट्रांचे संबंध सांभाळणे आपल्या दृष्टीने
महत्वाचे होते. त्यातील सर्वात शेजारील देश म्हणजे चीन. जगात सर्वात जास्त
लोकसंख्या असलेला हा देश परराष्ट्र धोरणांसाठी फार महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्या
देशाने या देशासोबत चांगले संबंध प्रस्थापित केले आहे.भारताने मैत्रिपुर्वक परराष्ट्र संबंध सांभाळत असताना घेतलेलामहत्वाचा निर्णय म्हणजे पंचशील करार..
पंचशील करार :
पंचशील तत्वांचा पुरस्कार सर्वप्रथम करणारे देश म्हणजे भारत आणि चीन. भारताला
स्वतंत्र मिळाल्यावर लवकरच चीन मध्ये साम्यवादी क्रांती होऊन माओ-त्झे-डॉन्ग
यांच्या नेतृत्वाखाली साम्यवादी सरकार सत्तेवर आले.आशियाखंडात प्रस्तुत दोन्ही देशांचे
स्थान विशेष महत्वपूर्ण आहे. दोन्ही देशांना प्राचीन संकृतीचा वारसा लाभलेला आहे.
इ.स.१९५४ मध्ये भारत आणि चीन यांच्यात मैत्रीचा एक करार या वेळी भारताचे
तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि चीनचे पंतप्रधान चाऊ-एन-लाय यांनी पंचशील
तत्वांचा पुरस्कार केला.
हि पाच तत्वे पुढीलप्रमाणे :
हि पाच तत्वे पुढीलप्रमाणे :
१.परस्परांची प्रादेशिकएकात्मता आणि सार्वभौमत्व यांबद्दल परस्परांशी आदर
बाळगणे.
२.परस्परांच्या प्रदेशावर आक्रमण न करणे.
३.परस्परांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे.
४. राष्ट्रीय समानता बाळगून परस्परांचे हित सांभाळणे.
५. शांततामय सहजीवन आणि आर्थिक सहकार्य या तत्वांचा स्वीकार करणे.
जगातीलइतर राष्ट्रांनी देखील या तत्वांचा स्वीकार केला. इ.स.१९५४ मध्ये पंडित
नेहरू आणि युगोस्लोव्हाकीयाचे त्या वेळचे अध्यक्ष मार्शल टिटो यांनी प्रसिध्द
केलेल्या संयुक्त जाहीरनाम्यात पंचशील तत्वांचा उल्लेख करण्यात आला. इ.स.१९५५
मध्ये बाडुंग येथे आफ्रो-आशियाई २९राष्ट्रांनीही पंचशील तत्वांना मान्यता दिली. याखेरीज
जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी पंचशील तत्वांचा गौरव केला होता आणि त्यांच्या
आचरणाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतील संघर्ष व तणाव कमी होण्यास मदत होईल.
पंचशील तत्वांचा पुरस्कार जरी चीनने केला असला तरी दुर्दैवाने चीननेच हि तत्वे
पायदळी तुडवली इ.स.१९६२मध्ये चीनने भारतावर विश्वासघाताने भारतीय प्रदेशावर आक्रमण
केले. याकृत्यामुळेआंतरराष्ट्रीय राजकारणात पंचशील तत्वांना लाभलेली प्रतिष्ठा
काही प्रमाणात कमी झाली.
आशिया खंडातील दोन महत्वाच्या देशांत निर्माण झालेल्या वैरभावाचा संपूर्ण आशिया
खंडातील राजकिय परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला होता; पण पुढे आपल्यातील हा
दुरावा फार काळ असाच राहू देणे हितकारक नाही याची दोन्ही राष्ट्रांना जाणीवझालीआणि
राजीव गांधी यांनी पुढाकार घेऊन इ.स.१९८८ मध्ये चीन ला अधिकृतरीत्या भेट दिली.
त्या वेळी सीमा प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त कृती समिती ची स्थापना केली.
मनमोहन सरकारच्या काळात चीन आणि भारत यांमध्ये आर्थिक संबंध वाढीस लागले याचा
मुलभूत फायदा दोन्ही देशांना झाला. २००५ पासून चीनी उत्पादनांना भारतीय बाजारपेठ
मिळाल्यानेभारत आणि चीन संबंध वृद्धींगत झाले.


No comments:
Post a Comment